तीर रपकन घुसला तिच्या मानेत, लागलेला तीर एक दिवस मानेतच..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

पण ती होती पक्की कणखर.. 

खेलो इंडियाद्वारे गुणवान खेळाडूंच्या गुणवत्तेस वाव देण्याचे काम केल्याचा डंका पिटला जातो, पण त्याचवेळी खेळाडूंच्यी सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. तिरंदाज मार्गदर्शक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे बारा वर्षीय मुलीच्या मानेत सहकाऱ्याच तीर घुसला आणि तो एक दिवस तिथेच राहिल्याने उपचारही अवघड झाले. 

ती करत होती तिरंदाजीचा सराव 

दिब्रुगडजवळील चाबुआ येथील दाखादेवी रसिवासिया महाविद्यालयाच्या मैदानावरील शिवांगिनी गोहैन तिरंदाजीचा सराव करीत होती. हे ठिकाण क्रीडा प्राधीकरणाशी संलग्न आहे. तरीही तिरंदाजीचा सराव सुरु असताना ना मार्गदर्शक होते, ना पदाधिकारी. या केंद्रात सहा मुले आणि पाच मुली शिकतात. त्याच मैदानावर फुटबॉल, क्रिकेटसारखे अनेक खेळ खेळले जातात. पण कोणीही मार्गदर्शक नसताना सराव सुरुच राहिला. याचवेळी कम्पाऊंडचा सराव करीत असलेल्या मुलाचा तीर शिवांगीनीच्या मानेत घुसला. 

मोठी बातमी - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मदतीस कोणीही पदाधिकारी नव्हते 

आपल्या मुलीच्या मानेत तीर घुसल्याचे पाहून शिवांगीनीचे वडिल मैदानात धावले. त्यावेळी त्यांच्या मदतीस कोणीही पदाधिकारी नव्हते. तिला त्यांनी चाबुआपासून 33 किलोमीटरवरील दिब्रुगड येथील आसाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेले. ही घटना घडली होती बुधवारी, पण ते रुग्णालयात पोहोचले गुरुवारी सकाळी. तेथील डॉक्‍टरांनी दिल्लीच्या एम्समध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी स्थानिक पातळीवरही चक्रे वेगाने हलवण्यात आली. 

मोठी बातमी - #CAA विरोधातील भव्य रॅलीचे शरद पवार नेतृत्व करणार! 

एका दिवसाहून जास्त वेळ होता मानेत तीर 

तीर तिच्या मानेत एका दिवसाहून जास्त वेळ होता. ती पक्की कणखर आहे. तिने हार मानली नाही. तिचे वडील रोजनदारीवर काम करणारे असणार. त्यांनाही याचा चांगला धक्का बसला असणार, असे आसाम तिरंदाजी संघटनेचे सचिव तपन दास यांनी सांगितले. दरम्यान क्रीडा प्राधीकरणाने तिच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी ठरवले. त्यासाठी तिला लगेच दिल्लीत हलवण्यात आले. तिच्यावर शुक्रवारी रात्रीपासून उपचार सुरु झाले आहेत. शस्त्रक्रियेबाबत लवकरच निर्णय होईल. ती पूर्ण शुद्धीवर आहे तसेच तिची प्रकृती स्थिर आहे.

मोठी बातमी - ED ची कारवाई, चंदा कोचर यांच्या 78 कोटींच्या संपत्तीवर टाच

शिवांगीनी जखमी झालेल्या मैदानावरील सरावासाठी क्रीडा प्राधीकरणाने मर्सी यांची नियुक्ती केली आहे, पण त्यांच्याकडे खेलो इंडियाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी तेथून निघताना मुलांना सराव थांबवण्यास सांगितले नाही किंवा तेथील शिबिराचे व्यवस्थापक असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही मुलांना ही सूचना दिली नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडले. 
- पुतिन दास, आसाम तिरंदाजी संघटनेचे सचिव 

Arrow Pierces Through 12-Year-Old Assam Archers Shoulder During Training


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrow Pierces Through 12-Year-Old Assam Archers Shoulder During Training