esakal | वर्षा राऊतांची पुन्हा ED वारी होणार; चौकशीसाठी पुन्हा समन्स
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षा राऊतांची पुन्हा ED वारी होणार; चौकशीसाठी पुन्हा समन्स

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ( varsha raut ) यांची सक्त वसुली संचलनालयाकडून ( ED ) पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

वर्षा राऊतांची पुन्हा ED वारी होणार; चौकशीसाठी पुन्हा समन्स

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ( varsha raut ) यांची सक्त वसुली संचलनालयाकडून ( ED ) पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना 11 जानेवारीला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

मुंबई परिसरातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ED कडून चौकशी करण्यात आली होती. ईडी कार्यालयात 3 ते 4 तास त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. प्रवीण राऊत हे एमसी बँंक घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी वर्षा राऊत यांचे आर्थिक संबध असून त्यांचाही पीएमसी बँक घोटाळ्याची काही संबध आहे का यासंबधीचा तपास ED कडून करण्यात येत आहे.

वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्याचे कारण काय?

पीएमसी बँकेतील घोटाळ्यातील चौकशीसाठी 29 डिसेंबर रोजी वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर रहावे लागले होते. प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्याच्याशी झालेल्या 55 लाख रूपयांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी वर्षा यांना बोलवण्यात आले होते. प्रवीण राऊत यांना ईडीने याप्रकरणी अटकही केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होत. 

Varsha Raut sommons from ED again pmc bank scam issue

------------------------------

loading image