

vasai Vadghar-Medha road bridge collapsed
ESakal
नालासोपारा : वसई पूर्व भागातील वडघरकडे जाणारा ४० वर्षांपूर्वीचा पूल कोसळला. त्यात ट्रक आणि कार अडकली. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. पूल कोसळल्याने पाच हजार लोकवस्तीचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरील पुलांची क्षमता नसतानाही ४० ते ५० अवजड वाहने येथून जात असल्याने हा पूल कोसळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.