Vasai gas leak : वसईत क्लोरिन सिलिंडर लीक, नागरिकांना श्वसनास त्रास; एकाचा मृत्यू, ११ जण रूग्णालयात

Chlorine Gas Leak in Vasai Divanman Area : दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी आणि आपत्ती व्यवस्थानप विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
Chlorine Gas Leak in Vasai Divanman Area

Chlorine Gas Leak in Vasai Divanman Area

esakal

Updated on

Chlorine Gas Leak in Vasai’s Divanman Area : वसईमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील दिवानमाण परिसरात एक क्लोरिनचा सिलिंडर लीक झाला. यामुळे हवेत विषारी वायू पसरल्याने एकाचा मृत्यू झाला आणि ११ जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज(मंगळवार) दुपारी वसई पश्चिम मधील दिवानमाण परिसरात अचानकपणे हवेत हिरव्या रंगाचा वायू परसला. यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला, एवढंच नाहीतर काहींना मळमळ, उलट्या देखील होवू लागल्या. तर काहींच्या डोळ्यात जळजळ सुरू झाली, काहींना दम लागायला लागला. 

अचानकपणे असा त्रास का होवू लागला हे लवकर लक्षात आले नाही, मात्र नंतर जेव्हा लोकांना त्या वायूबाबत समजले तेव्हा लोकांनी त्या परिसरातून बाहेर जाण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत या विषारी वायूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याशिवाय अन्य अकरा जणांना प्रचंड त्रास होवू लागल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Chlorine Gas Leak in Vasai Divanman Area
Prakash Solanke taunt Dhananjay Munde : ‘’फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा, आणि...’’ ; प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंना जोरदार टोला!

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी आणि आपत्ती व्यवस्थानप विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यानंतर हा हा वायू आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तोपर्यंत नागरिकांना परिसरातून बाहेरच थांबवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com