वसईत दरड कोसळली, चौघे अडकल्याची भीती

यादी जाहीर मात्र कार्यवाही शून्य
Landslide
Landslide sakal

वसई : प्रसाद जोशी वसईच्या भोयदापाडा राजवली याठिकाणी ( ता. 13 ) सकाळच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग घरावर कोसळल्याने 4 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली आहे, यातील दोन जण सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यातच वसई पूर्वेकडील राजावली येथे अचानक दरड घरावर कोसळली व नागरिक अडकले. हे ठिकाण अडगळीचे असल्याने जेसीबी व अन्य यंत्रणा याठिकाणी जाऊ शकत नसल्याने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पहारीच्या साहाय्याने दगड बाजूला करण्याचे काम केले जात आहे दोन नागरिकांना सुखरूप काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली. भुत्खलन झाल्याने येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला असतांना अद्याप शासकीय अधिकारी घटनास्थळी आले नाहीत या सर्व प्रकाराला महापालिका जबाबदार आहे असा आरोप मनसेचे पदाधिकारी जयेंद्र पाटील यांनी केला.

यादी जाहीर मात्र कार्यवाही शून्य

वसई विरार महापालिकेने 11 भूस्खलन भागाची यादी जाहीर केली पावसाळ्यात याठिकाणी नागरिकांना मज्जाव करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले यात राजावलीचे नाव यादीत नाही. घटना पाहता केवळ यादी प्रसिद्ध करून समाधान मानले का ? सुरक्षेचे काय असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com