
विरार : वसई, सांडोर येथील जेराल्ड परेरा (५०) आणि श्रीमती प्रिया परेरा (४६) यांचे १० मे २०२५ रोजी फिलीपिन्समधील सेबूमधील बाडियान येथे झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले. बाडियान पोलिस स्टेशनच्या अधिकृत अहवालानुसार, जेराल्ड आणि प्रिया दुचाकीवरून जात असताना एका फिलिपिनो नागरिकाने बेपर्वाईने चालवलेल्या टोयोटा हिलक्स ट्रकने धोकादायक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि नियंत्रण गमावले आणि त्यांना धडक दिली.