

The team has been serving pilgrims for the past six years, treating foot pain, fatigue and other health issues during the pilgrimage.
Sakal
विरार : मुखी ज्ञानोबा माउली तुकाराम आणि विठू माउलीचे नाव घेत मुंबई आणि वसईतील डॉक्टरांचा एक ग्रुप सध्या वारीला आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यात दंग झाला आहे. एरव्ही रुग्णाच्या गराड्यात असलेले डॉक्टर सध्या धोतर, सदरा, पायजमा, डोक्यावर गांधी टोपी कपाळावर गंध लावून सकाळी ५ वाजल्यापासून वारीत चालून थकलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यात रमले आहेत. हा ग्रुप गेल्या सहा वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहे.