

Chaos During Film Shooting at Historic Vasai Fort
Sakal
विरार : ऐतिहासिक वसई किल्ल्यात वेब सिरीज व चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या युनिट्सने मागील काही काळात घुमाकुल घातला आहे पुरातत्त्व विभागाच्या अधिनियमानुसार येथील वास्तूंना चित्रीकरण करताना नुकसान पोहोचू नये असे असतानाही याठिकाणी त्या नियमाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. या विरोधात वसईतील इतिहास प्रेमीनी शुक्रवारी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून तक्रारी केल्या.