वसई रोड-दिवा-पनवेल मेमू रेल्वे सेवा पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

वसई रोड-दिवा-पनवेल मेमू रेल्वे सेवा पूर्ववत

मुंबई : पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गाला जोडणारी दिवा-वसई रोड, पनवेल-दिवा-वसई रोड ही ‘मेमू’ गाडी सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासात जाणारा अतिरिक्त वेळ आणि पैसाही वाचणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार उपनगरीय लोकलप्रमाणे या मेमूला कोरोना नियम लागू आहेत. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दैनंदिन तिकीट मिळेल; तर कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांना मासिक पास मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

कोरोना टाळेबंदीमुळे पनवेल-दिवा-वसई मेमू गाडी बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. रस्ते मार्गाने गेल्यास वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत होता. तसेच इंधन दरवाढीमुळे हा प्रवास खिशाला अधिक कात्री लावणारा होता. दुसरीकडे रेल्वेमार्गाने वसईहून पनवेलकडे जाणे द्रविडी प्राणायम होता. उद्यापासून (शुक्रवार) या मेमू गाड्या सुरू होत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

मध्य रेल्वेच्या प्रस्तावानुसार दिवा-वसई रोड मेमू गाडीच्या दररोज आठ फेऱ्या होतील. वसई रोड-पनवेल मेमू गाडीच्या रोज सहा फेऱ्या होतील; तर पनवेल-दिवा-वसई रोड मेमूच्या शनिवार व रविवार वगळता दररोज आठ फेऱ्या होतील.

loading image
go to top