

Unseasonal Rains Delay Traditional Vasai Sukeli by One Month
Sakal
विरार : वसईची ओळख असलेली सुकेळी अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे एक महिना उशिराने आता बाजारात दाखल होऊ लागली आहेत. त्यातच वसईतील राजेळी केळीचे उत्पादन घटले आहे. परिणामी सुकेळींच्या उत्पादनावरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सुकेळींचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी वसईतील उत्पादकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.बाजारात आलेल्या सुकेळीला आता किलोला ६०० रुपये इतका भाव मिळत आहे. वसईची ओळख असलेली सुकेळी हि पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबटगोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही वसईची खास ओळख आहे.