

Vasai-Tivari land scam ₹1000 crore
Sakal
विरार : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील टिवरी भागात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तब्बल १,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या जमिनीचा महाघोटाळा मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तलंय अंतर्गत आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून, या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ४ फेब्रुवारी २०२६ रोजी हेमंत पाटील, धर्मेश शहा, दिपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजि क्रं. ०१२७/२०२६ प्रमाणे,भारतीय न्याय संहिता (बी एन एस २०२३) अंतर्गत कलम, ३(५), ३१६(५),३१८(४), ३३६(२), ३३६(३) ३३८, ३३९, ३४०(१) नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे