

Garbage piles up at the dumping ground in Gokhivre-Bhoydapada, raising concerns over air quality and public health in Vasai-Virar.
Sakal
विरार : वसई-विरार शहराची लोकसंख्या आणि विस्तार झपाट्याने वाढत असताना कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गोखिवरे-भोयदापाडा येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले असून, जुन्या कचऱ्याचे प्रमाण सुमारे १५ लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचला आहे. त्यातच दररोज नव्याने निर्माण होणारा तब्बल १ हजार ते १ हजार २०० मेट्रिक टन कचरा जमा होत असल्याने डम्पिंग ग्राऊंडवरील भार कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, धूर आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.