

Vasai-Virar Waterfall, Beaches Banned
ESakal
विरार : वसई तालुक्याला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. एका बाजूला उंच डोंगर त्यातून पावसाळ्यात वाहणारे धबधबे,तर दुसऱ्या बाजूला पसरलेला अथांग समुद्र त्यामुळे वसई विरार मध्ये पर्यटकांची संख्या मिथ्या प्रमाणावर असते. वसई-विरार परिसरातील निसर्गरम्य धबधबे, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर पावसाळ्यात दरवर्षी अनेक दुर्दैवी दुर्घटना घडत असतात.