
ED Action On Anilkumar Pawar
ESakal
मुंबई : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी लाचखोरीतून तब्बल १६९ कोटी रुपये जमवले. या पैशांतून त्यांनी सोने-चांदीचे दागिने, हिरे, मोती, महागड्या साड्या खरेदी केल्या. तसेच पत्नीच्या नावे मालमत्ताही खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे. नुकतेच त्यांच्याविरोधातील आरोपपत्र ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केले.