

VVMC Action On Dangerous building
ESakal
विरार : विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरातील हिराबाई अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग कोसळल्यानंतर वसई-विरार महापालिकेने इमारत धोकादायक घोषित करून ती रिकामी केली आणि प्रवेशद्वार सील केले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ६५ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.