लसीकरणासाठी वसई विरार पालिका सज्ज, 10 केंद्रातून दिवसाला हजार लाभार्थ्यांना देणार लस

लसीकरणासाठी वसई विरार पालिका सज्ज, 10 केंद्रातून दिवसाला हजार लाभार्थ्यांना देणार लस

मुंबईः  वसई विरार महापालिकेचा आरोग्य विभाग लसीकरणाच्या ड्राय रनसाठी सज्ज झाले आहे. वसई पूर्व वरून इंडस्ट्रीजमध्ये अतिशय भव्य परिसर असणाऱ्या ठिकाणी  लसीकरणाच्या पूर्वीच्या ड्राय रनसाठी पूर्ण तयारी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. कोविड- 19च्या अँपमध्ये वसई विरार महापालिकेकडे आतापर्यंत पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी क्षेत्रातून वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या साडे पाच हजारांच्यावर अधिकारी कर्मचारी यांची नोंद झाली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे आज लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून डेमो करण्यात आला आहे. 

वसई पूर्ववरून इंडस्ट्रीजमधील अलगीकरण कक्षात लसीकरण केंद्र सुरू केले. आज महापालिकेचे उपायुक्त डॉ किशोर गवस, आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेखा वाळके, डॉ राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले आहे.  केंद्रात प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यानंतर एकावेळी 10 रूममध्ये ही लसीकरण मोहीम सुरू असणार आहे. त्यासाठी 5 जणांचा स्टाफ तयार करण्यात आला आहे. या स्टाफमध्ये डॉक्टर, ए एन एम, जि एन एम, अशा वर्कर, आणि एक सेक्युरिटी असणार आहे. एका केंद्रात दिवसभरात 100 लाभार्थ्यांना लस देण्यात येणार असून 10 केंद्रातून दिवसाला एक हजार लाभार्थ्यांना लस देण्याची क्षमता वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली ठेवली आहे. 

लाभार्थीं लसीकरण केंद्रात आल्यानंतर तो नोंदणी झालेला आहे का याची प्रथम सेक्युरिटी कडून, त्यानंतर प्रतिक्षालयात त्याची चौकशी होणार, नंतर प्रत्यक्ष त्याला लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर बाजूलाच त्याची डॉक्टर पूर्ण बॉडीची तपासणी करणार आहे. 30 मिनिटं त्याला बेड रेस्ट देण्यात येईल. काही प्रॉब्लेम जाणवले नाही तर सोडणार अन्यथा त्याच ठिकाणी आणि महापालिकेने अधिग्रहित केलेल्या रुग्णालयात तात्काळ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहे. लसीकरणाच्या व्हॅकसीनसाठी स्वतंत्र वातानुकूलित रुम बनविली असून, तापमानाप्रमाणे त्यात लस ठेवण्यात येणार आहेत. 

केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे वसई विरार महापालिका कोव्हीड 19 च्या लसीकरणासाठी सज्ज झाले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे लस येताच आम्ही ते सुरू करणार आहोत अशी माहिती  वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेखा वाळके यांनी दिली आहे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Vasai Virar Municipal Corporation vaccination one thousand people daily 10 centers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com