esakal | गणेशोत्सव मंडळांचे मंडप शुल्क माफ; कल्याण-डोंबिवली महापालिकेचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Lord Ganesh

गणेशोत्सव मंडळांचे मंडप शुल्क माफ; कल्याण-डोंबिवली महापालिकेचा मोठा निर्णय

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कोरोनामुळे (corona) आर्थिक संकटात (financial Crisis) सापडलेल्या गणेशोत्सव (Ganpati Festival) मंडळांचे मंडप शुल्क माफ (Decoration Charges) करण्याचा निर्णय अखेर गुरुवारी महानगरपालिकेने (KDMC) घेतला. मुंबई - ठाणे महापालिकेने मंडळांचे शुल्क माफ करूनही कल्याण डोंबिवली महापालिका मंडळांच्या मागणीचा विचार करीत नसल्याने मंडळांनी शुल्क न भरण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी दै. सकाळने वृत्त (sakal news impact) प्रसारित करीत वाचा फोडली होती. अखेर उशिरा का होईना कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (vijay suryavanshi) यांनी मंडळांची मागणी मान्य केल्याने मंडळांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा: मुंबई महापालिका रोखणार 'सुप्त क्षयरोगा'चा प्रसार; राबविणार विशेष मोहिम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळेही आर्थिक संकटात सापडली असून मंडळांचे महापालिका तसेच अग्निशमन दलाकडून आकारण्यात येणार मंडप शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे कल्याण डोंबिवलीतील गणेश मंडळांनी केली होती. मुंबई, ठाणे महानगरपालिकेने मंडळांचे मंडप शुल्क रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला, मात्र कल्याण डोंबिवली महापालिका आपला निर्णय जाहीर करत नव्हती. यावर कल्याण शहर गणेशोत्सव समनव्य संस्थेने कल्याण डोंबिवलीतील गणेश मंडळे मंडप शुल्क भरणार नाही असा इशारा पालिकेला दिला होता. याविषयी दै. सकाळ ने 27 ऑगस्टला 'कल्याण डोंबिवलीत मंडप शुल्क भरणार नाहीत पालिके विरोधात गणेश मंडळांचा निर्णय' या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते.

अखेर गुरुवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक पार पडली. यात 92 मंडळांनी सहभाग घेतला होता. यावेळी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी मंडळांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, मात्र परवानगी तसेच फायर एनओसी घेणे मंडळांना बंधनकारक राहील असे सांगितले. उशिरा का होईना महापालिका प्रशासनाने हा निर्णय जाहीर केल्याने मंडळांत आनंदाचे वातावरण असल्याचे कल्याण शहर गणेशोत्सव समनव्य संस्थेचे संस्थापक संतोष पष्टे यांनी सांगितले.

हेही वाचा: पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण; 233 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

महापालिकेची तयारी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाहतूक शाखा यांचा ना-हरकत दाखला, अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला, म.रा.वि.वि.कं.लिमिटेड यांच्याकडील तात्पुरती परवानगी व पोलिस स्टेशनचा ना-हरकत दाखला इ. करीता संबंधित प्रभागक्षेत्र अंतर्गत असणा-या स्थानिक पोलिस स्टेशन निहाय प्रभाग कार्यालयातील कर्मचा-याची नियुक्ती करुन "एक खिडकी योजना" कार्यान्वित करण्यात येईल.

- परवानगीसाठी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज मंडळांनी सादर करावेत.

- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची साईज 6x8 इतकीच असावी

- महापालिका परिसरात एकुण 68 विसर्जन स्थळांवर श्रीगणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

- विसर्जन स्थळी व विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांची त्याचप्रमाणे 2447 हॅलोजन लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवा दरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकुण 66 जनरेटर बसविण्यात येणार आहे.

- कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी "विसर्जन आपल्या दारी" हा उपक्रम महापालिकेमार्फत राबविला जाणार आहे.

- गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघ‍डीप दिल्यानंतर सर्व मुख्य रस्त्यांवरील तसेच विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविणेबाबतच्या सुचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.

loading image
go to top