
विरार : राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व प्रभागनिहाय मतदारसंख्या नुकतीच प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यादृष्टीने राजकीय पक्षाच्या हालचालींनाही चांगलाच वेग आला असला तरी काँग्रेसने प्रभाग रचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने महापालिकेत घेण्यात आलेली २९ गावांचे काय निर्णय लागतो याकडे गाववासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.