₹68-Crore Road Repair Contract Fails to Show Ground Reality
Sakal
विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्याची दुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी ६८ कोटी रुपयांच्या कंत्राटाचा कार्यादेश दिल्यानंतरही वसई-विरारमधील रस्त्यांची दुरुस्ती सुरू झालेली नाही. परिणामी पावसाळा संपल्यानंतर शहरातील लाखो नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधत सत्ताधारी भाजपाचे वसई जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी नागरिकांच्या त्रासाबद्दल अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सत्ताधाऱयांच्या ह्या मागणीमुळे वसई मध्ये खळबळ उडाली आहे.