Vasai Virar Water Crisis: वसई-विरारमध्ये पाणीसंकटाची चाहूल; ऐतिहासिक तलावांमध्ये कचरा, जलपर्णीचा विळखा

Water Scarcity Looms as Historical Lakes Face Pollution: धरणांतील पाणीसाठा घटतोय, तलावांची अवस्था बिकट; वसई-विरारमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर
Vasai Virar Lakes Choked With Garbage and Water Hyacinth Amid Falling Reservoir Levels and Rising Water Scarcity Concerns

Vasai Virar Lakes Choked With Garbage and Water Hyacinth Amid Falling Reservoir Levels and Rising Water Scarcity Concerns

esakal

Updated on: 

विरार : यावर्षी सगळ्यात कमी पाऊस पडल्याने पाण्याची झळ सामान्य माणसाला लागणार असली तरी पालिकेचे मात्र प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाले आहे. वाढती उष्णता आणि कमी पर्जन्यमानामुळे धरणांतील पाणीसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. अशा संभाव्य पाणीटंचाईच्या कठीण काळात वसई-विरार शहरातील पारंपरिक जलस्रोतांचे व तलावांचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील बहुतांश तलाव कचरा आणि जलपर्णीमुळे प्रदूषित झाल्याचे चित्र दिसून येत आहे.महापालिकेच्या ऑगस्ट मध्ये झालेल्या महासभेत शहरातील तलाव ,विहिरी साफ करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसत आहे.

Loading content, please wait...