वसई : युवकांनी व्यसनाची नव्हे वाचनाची संगत धरावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

वसई : युवकांनी व्यसनाची नव्हे वाचनाची संगत धरावी : न्यायाधीश सुधीर देशपांडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : तणाव येत असेल तर युवकांनी विविध छंद जोपासावेत. व्यस्त राहावे, राष्ट्रउभारणीसाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रपुरुषांचा शोध घ्यावा, भ्रष्टचारमुक्त समाजव्यवस्थेची गरज आहे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता वाचनावर भर द्यावा, असे प्रतिपादन न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी वसईत केले.

संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभाग, एनएसएस एनसीसी, डीएएलई व तालुका विधी सेवा समिती वसई यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्य जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे तसेच आर. एच. नथानी, आर. एन. चव्हाण, अड. जॉर्ज फरगोज, ॲड. स्टेविना दोडती उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : संत गाडगे महाराज वसाहतीत पोट भाडेकरू

न्यायदंडाधिकारी रेल्वे न्यायालय आर. एन. चव्हाण यांनी रॅगिंगसंदर्भात; तर स्टेवीना दोडती यांनी महिला अत्याचार संबंधित कायदे यासंदर्भात माहिती दिली. ॲड. जार्ज फरगोज यांनी मालमत्ता खरेदी-विक्रीबाबतचे कायदे आणि वैकल्पिक वाद निवारण राज्य विधी प्राधिकरणाच्या योजना यासंदर्भात विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. डॉ. रामदास तोंडे, प्रा. इवॉन सखरानी, डॉ. नंदकुमार झांबरे यांच्यासह अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांनी केले; तर सूत्रसंचालन ग्रामीण विकास विभागाचे प्रमुख डॉ. अरुण माळी व आभार प्रा. गुणवंत गडबडे यांनी मानले.

loading image
go to top