
नवी मुंबई : फूल उत्पादक शेतकऱ्यांनी प्लॅस्टिकच्या फुलांना विरोध केल्यामुळे प्लॅस्टिकची फूलविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर संक्रांत आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात बंदीचा हा निर्णय झाल्यास विक्रेत्यांना लाखो रुपयांचा फटका बसेल, अशी शक्यता वाशीच्या एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.