APMC तील हुक्का पार्लरवर वाशी पोलिसांचा छापा, तरुण-तरुणींसह कर्मचारी ताब्यात

APMC तील हुक्का पार्लरवर वाशी पोलिसांचा छापा, तरुण-तरुणींसह कर्मचारी ताब्यात

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं घालून दिलेल्या अटींशर्थींचे उल्लंघन करुन चालविल्या जाणाऱ्या एपीएमसीतील आर.बी. डी. लाँच या हुक्का पार्लरवर वाशी पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी दाटीवाटीने बसलेल्या 32 तरुण तरुणींना आणि 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित हुक्का पार्लरमधून हुक्का ओढण्यासाठी लागणारे तंबाखू आणि इतर साहित्य देखील जप्त  केले आहे.  

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं सर्व प्रकारचे हॉटेल्स, पब्स आणि बार आदींना अटी आणि शर्थी घालून सुरु ठेवण्याबाबात सक्त सुचना दिल्या आहेत. असे असताना, एपीएमसी सेक्टर-19डी मधील शक्ती आर्केडमध्ये असलेल्या आर.बी. डी. लाँच या हुक्का पार्लरमध्ये सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन करुन हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हुक्का पार्लरवर छापा मारला.

यावेळी हुक्का पार्लरमध्ये हुक्का ओढण्यासाठी बसलेले तरुण तरुणी हे कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतर न ठेवता हुक्का ओढत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या 32 तरुण तरुणींना तसेच त्यांना हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य पुरविणाऱ्या हुक्का पार्लरमधील 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या सर्वांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह इतर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व तरुण तरुणीं आणि कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Vashi police raids hookah parlor APMC arrests youth and staff

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com