वाशिंद : 'झापडा का थापडा' वार्षिक शिबीर

दिनेश मराठे    
रविवार, 20 मे 2018

मुंबई : प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही विद्यार्थी भारती संघटनेमार्फत 11 वे वार्षिक राज्यस्तरीय शिबिर 26 मे ते 1 जून  या कालावधीत शासकीय आश्रमशाळा (दहागांव, वाशिंद) या ठिकाणी आयोजित केले आहे. हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी पुर्णतः मोफत असणार आहे. शिबिराचे नाव 'झापडा का थापडा' असून, सध्या चाललेल्या रॅटरेसमध्ये विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर जी झापडं लागलेली आहेत ती हटवण्याचा या शिबिराचा हेतू आहे. 

या शिबिरात समाज जीवनावर व शिक्षण प्रणालीवर भाष्य करणार्या अनेक व्याख्यानांची आखणी करण्यात आली आहे. या शिबिरात काही ख्यातनाम वक्तेही उपस्थिती दर्शविणार आहेत. शिबिरात गाणी, नाच, पथनाट्य व शॉर्टफिल्म या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न असणार आहे. गाणी, खेळ आणि मजामस्ती सोबतच वैचारिकरीत्या मुलांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

एकंदरीत या सात दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक जडणघडणीत बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. तसेच या शिबिरात नवीन विद्यार्थीही आपला सहभाग नोंदवू शकतात. चर्चा व व्याख्याने ठेवून मुलांमध्ये एक नवी ऊर्जा प्रेरित करत आहोत. या शिबिरात खेळ, गाणी, मजा-मस्ती या बरोबरच वैचारिक कार्यक्रमांचाही पैलू असणार आहे.शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून 80 ते 100 मुले-मुली सहभागी होणार आहेत. तसेच नविन विद्यार्थीही आपला सहभाग नोंदवू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क - आशिष गायकवाड - 955201412, प्रणय घरत -      9594827055, जितेश पाटील -     8698315552

Web Title: vashind: 'jhapada ki thapda' annual camp