भीतीचे कारण नाही; एपीएमसीत आहे 'या' जीवनावश्यक साधनांचा मुबलक साठा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती नागरिकांना वाटत होती; परंतु विक्रेत्यांकडे भाजीपाल्याचा मुबलक साठा आहे. एपीएमसी मार्केटमधून भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरू असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईतील भाजी मंडया आठवड्यातून काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती व महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती नागरिकांना वाटत होती; परंतु विक्रेत्यांकडे भाजीपाल्याचा मुबलक साठा आहे. एपीएमसी मार्केटमधून भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरू असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

ही बातमी वाचली का? मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

रविवारी (ता. २२) ‘जनता संचारबंदी’ असल्याने शुक्रवारी-शनिवारी भाजी मंडयांत ग्राहकांची गर्दी होऊ शकते, असा अंदाज बांधूत भाजी विक्रेत्यांनी यापूर्वीच साठा करून ठेवला. एपीएमसी मार्केट बंद असले, तरी विक्रेत्यांच्या गाळ्यांमध्ये भाजीपाला आहे. आवक सुरळीत सुरू असल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत, अशी माहिती भायखळा मंडईचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली.

ही बातमी वाचली का? संजय राऊत म्हणतात, त्या सगळ्यांना क्वारंटाईन करा...

दादरची भाजी मंडई सोमवार, गुरुवार आणि रविवारी बंद ठेवण्यात येईल. भाजीपाल्याची आवक व्यवस्थित सुरू आहे. ग्राहकांची गर्दी कमी झाल्याने आवश्‍यकतेनुसार माल मागवण्यात येतो, असे दादर येथील विक्रेते संदीप भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा - कोरोनाच्या धास्तीने रक्ताचे नातेही थिटे

एपीएमसी बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शुक्रवारी ९७० गाड्या भाजीपाला आला. या बाजारातून मुंबईतील विक्रेते पुरेसा भाजीपाला घेऊन जातात. 
- शंकर पिंगळे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetable stock Available in Vashi APMC market