Vegetables Price Fall: ग्राहकांना दिलासा! एपीएमसीत आवक वाढल्याने भाजीपाला स्वस्त

Vegetables Price: नवी मुंबई एपीएमसीच्या घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला स्वस्त झाला असून ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
Vegetables Price Fall

Vegetables Price Fall

ESakal

Updated on

वाशी : नवी मुंबई एपीएमसीच्या घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहेत. घाऊक बाजारात कोबी सहा ते आठ रुपये प्रतिकिलो, तर फ्लॉवर १० ते १६ रुपये प्रतिकिलो भावाने विकला जात आहे. हिवाळ्यातील हवामान भाज्यांसाठी अनुकूल असते. त्यामुळे या हंगामात भाज्यांचे चांगले उत्पादन होते. बाजारात चांगल्या, ताज्या हिरव्या भाज्या उपलब्ध होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com