ठाणेः ई चलन न भरल्यास वाहन जप्तीची कारवाई, वाहतूक शाखेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणेः ई चलन न भरल्यास वाहन जप्तीची कारवाई, वाहतूक शाखेचा इशारा

येत्या दहा दिवसात ई चलनाची रक्कम न भरल्यास वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. 

ठाणेः ई चलन न भरल्यास वाहन जप्तीची कारवाई, वाहतूक शाखेचा इशारा

मुंबईः ठाणे शहरात जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे.  वर्षभरात महिन्यात 22 कोटी रुपयांची चलान फाडले आहेत. मात्र, त्यातील बहुतांश वाहनचालकांनी दंड भरण्यास निरुत्साह दाखवला आहे. अशा वाहन धारकांविरोधात वाहतूक शाखेने कारवाईचे दंड थोपटले आहे. त्यानुसार येत्या दहा दिवसात ई चलनाची रक्कम न भरल्यास वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. 

दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेमार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंडात्मक चलान फाडून कारवाई करण्यात येत असते. अशा पद्धतीने करण्यात आलेल्या कारवाईचा आकडा मोठा असला तरी दंडाची रक्कम वसूल होताना दिसत नाही. अथवा वाहन चालकांकडूनही दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दंडाची थकबाकी वसूल करण्यासाठी वाहतूक शाखेने प्रयत्न सुरु केले आहेत.

अधिक वाचा-  पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर

येत्या दहा दिवसांमध्ये प्रलंबित असलेल्या ई चलानची रक्कम भरण्याची मुदत चालकांना देण्यात येत आहे. अन्यथा 1 डिसेंबरनंतर दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे ठाणे शहर वाहतूक शाखेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्याच्या कालावधीत 5 लाख वाहन चालकांवर ई चलनाद्वारे कारवाई करण्यात आली असून 22 कोटींचा दंड आकरण्यात आला आहे. त्यापैकी केवळ 60 टक्केच साधारणत: 12 कोटी इतकाच दंड वसूल झाला आहे. सुमारे 10 कोटींचा दंड अद्यापही कारवाई करण्यात आलेल्या वाहनधारकांकडून भरण्यात आला नाही. अशा वाहनधारकांनी 10 दिवसाच्या आत दंड न भरल्यास 1 डिसेंबरपासून कारवाईचा  बडगा उगारीत वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

अधिक वाचा- ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय

गाडी परवाना निलंबनाची कारवाईची शक्यता

पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम प्रलंबित असलेल्या चालकांवर केसेस करण्यात येतील. ही कारवाई करत असताना मोटार वाहन कायदा कलम 207 अन्वये गाडी ताब्यात घेतली जाऊ शकते. तसेच गाडी परवाना निलंबनाची कारवाई होईल. या कारवाईने नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मुदतीत नागरिकांनी दंडाची थकीत रक्कम भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Vehicle confiscation action if e challan is not paid Warning of Thane City Transport Branch

loading image
go to top