ठाण्यातील 'या' वर्दळीच्या भागात लागतोय वाहनांना ब्रेक

दीपक शेलार
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

स्मार्ट शहराकडे झेपावणाऱ्या ठाणे शहरातील वागळे इस्टेटमधील रस्ता क्र. 33 वरील संत ज्ञानेश्‍वरनगर ते कामगार रुग्णालयाच्या रस्तारुंदीकरणाला दीड वर्षाहून अधिक काळ उलटला तरी अद्यापही रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एका दुचाकीस्वाराचा अपघातात बळीदेखील गेला होता. कंत्राटदाराच्या या सुस्त कारभारामुळे स्थानिक नागरिक प्रचंड हैराण झाले असून सकाळ-संध्याकाळी संपूर्ण वागळे इस्टेटची कोंडी होत असल्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

ठाणे : स्मार्ट शहराकडे झेपावणाऱ्या ठाणे शहरातील वागळे इस्टेटमधील रस्ता क्र. 33 वरील संत ज्ञानेश्‍वरनगर ते कामगार रुग्णालयाच्या रस्तारुंदीकरणाला दीड वर्षाहून अधिक काळ उलटला तरी अद्यापही रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एका दुचाकीस्वाराचा अपघातात बळीदेखील गेला होता. कंत्राटदाराच्या या सुस्त कारभारामुळे स्थानिक नागरिक प्रचंड हैराण झाले असून सकाळ-संध्याकाळी संपूर्ण वागळे इस्टेटची कोंडी होत असल्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

हे आवश्य वाचापोल्ट्री व्यवसाय संकटात 

ठाण्यातील नितीन कंपनी जंक्‍शन ते इंदिरानगरकडे जाणाऱ्या वागळे इस्टेट रस्ता क्र. 33 या दोन पदरी रस्त्यावर सकाळ-संध्याकाळी वाहनांची मोठी वर्दळ असते. हा संपूर्ण परिसर कामगार वसाहतीचा असल्याने येथून पायी ये-जा करणाऱ्यांसह वाहनांचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर असते.

याच रस्त्यावर कामगार रुग्णालय ते ज्ञानेश्‍वरनगरपर्यंतच्या एका दिशेच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम जून 2018 ला ठाणे महापालिकेमार्फत सुरू करण्यात आले. येथील व्यापारी विस्थापितांना गाळे उभारून देण्याचे काम प्रगतिपथावर आहे; मात्र रस्त्याचे काम अंत्यत कूर्मगतीने सुरू असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. 

काय घडलं नेमकं? तिला वाचवता वाचवता तोच जळाला

दोनच दिवसांपूर्वी महापालिकेच्या घंटागाडीचा धक्का लागून एक दुचाकीस्वार थेट गाडीखाली सापडून ठार झाला होता. सध्या या ठिकाणी खोदकाम तसेच मलनिःसारण आणि गटार बांधण्याचे काम सुरू आहे. ही कामे संथगतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

एकीकडे विकासकामे लवकरात लवकर करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. रस्त्याची कामे मार्गी लावावीत यासाठी अनेक लोकप्रतिनिधीदेखील मागणी करीत आहेत; मात्र दुसरीकडे काही ठिकाणी रस्ते फक्त खोदून ठेवले आहेत. ठेकेदाराच्या संथगती कारभारामुळे संत ज्ञानेश्‍वरनगर, कामगार रुग्णालय, तसेच अंबिकानगर या परिसरातील रस्ते अर्धवट राहिल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. 

वागळे इस्टेट परिसरातील रस्तारुंदीकरण करण्यात यश मिळाले आहे. भविष्यात रस्ता क्रमांक 33 च्या रुंदीकरणामुळे वाहतुकीची समस्या सुटणार आहे; मात्र गेले दीड वर्ष हा रस्ता असाच आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आयुक्त आणि महापौरांनीच याकडे लक्ष घालून रस्त्याचे कॉंक्रीटीकरण पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला द्यावेत. 
- संतोष वडवले, स्थानिक नगरसेवक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles are slowing down in 'this' area of Thane