तिला वाचवता वाचवता तोच जळाला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अनिल यांच्या घराला आग लागली.

घराला अचानक आग लागली असताना पत्नीला वाचवण्यासाठी आगीत उडी घेतलेल्या पतीला आपला जीव गमवावा लागला आहे. पत्नीला वाचवताना स्वतःच जास्त भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - मुंबई महापालिकेत ८१० लिपिक पदे भरणार

अनिल निनान (वय ३२) असे या मृत व्यक्तीचे नाव असून अनिल ते मूळचे केरळचे आहेत. सध्या यूएईच्या अबू दाबी प्रातांत ते वास्तव्यास असून मागील आठवड्यात त्यांच्या घरी अचानक आग लागली होती. त्यावेळी आगीच्या कचाट्यात सापडलेल्या आपल्या पत्नीला वाचवायला अनिल यांनी आगीत उडी घेतली. पत्नीला वाचवताना अनिल स्वतछ मात्र ९० टक्के भाजले आणि उपचारदारम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबद्दलची माहिती एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने दिली आहे.

महत्त्वाची बातमी - वांद्रे किल्ल्यावरुन श्रेयाचे राजकारण सुरु
 

असे घडले अघटीत

अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अनिल यांच्या घराला आग लागली. त्यात यांची पत्नी निनू ही आगीच्या कचाट्यात सापडली. त्यांची आरडाओरड ऐकून अनिल बेडरूममधून बाहेर आले आणि त्यांनी पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात अनिल स्वतःच ९० टक्के भाजले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत अनिल आणि निनू यांच्या ४ वर्षांच्या मुलालाही इजा झाली असूव त्याला अबूदाबीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

web title : while saving wife husbend died


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: while saving wife husbend died