"व्यंकय्या नायडूंनी माफी मागावी, अन्यथा मुंबईत पाऊल ठेऊ देणार नाही"; शिवसेनेतील 'कुणी' दिलाय हा निर्वाणीचा इशारा...

"व्यंकय्या नायडूंनी माफी मागावी, अन्यथा मुंबईत पाऊल ठेऊ देणार नाही"; शिवसेनेतील 'कुणी' दिलाय हा निर्वाणीचा इशारा...

मुंबई : छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना मुंबईत पाय ठेऊ दिला जाणार नाही, असा इशारा मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिला आहे. उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आणि भवानी मातेच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या होत्या. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यावर नायडू यांनी त्या घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकल्या. यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याचाही आरोप केला जात आहे. 

याबाबत नायडू यांचा निषेध करण्यासाठी काल शिवसेनेचे उत्तर मुंबई विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस आणि सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्षा संध्या जोशी, नगरसेवक संजय घाडी, रिद्धी खुरसंगे, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते. महाराजांच्या अवमानाबद्दल नायडू यांनी माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नायडू यांनी यासंदर्भात क्षमायाचना केलीच पाहिजे, तोपर्यंत त्यांनी मुंबईत येऊ नये. तरीही ते मुंबईत आलेच, तर शिवसैनिक काय असतात ते त्यांना दाखवून देऊ, असेही सुर्वे यांनी सकाळ ला सांगितले. 

उदयनराजेंनी दिलेल्या घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकण्यास काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितल्याचे समोर येत आहे. मात्र हे अजून सिद्ध झाले नाही, काँग्रेसजनांनी तसे केले असेल तर चूक ते चूकच. पण तरीही नायडू यांनी लगेच त्यांची री ओढायला नको होती, असे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सकाळ ला सांगितले. याबाबत नायडू यांचीच भूमिका प्रमुख आहे, तसेच दुसरे म्हणजे काँग्रेसजनांनी घोषणा काढण्यास सांगितले असते तर उदयनाराजेंनी तेथेच त्यांचा निषेध करायला हवा होता. उदयनराजेंनी काँग्रेसजनांचा निषेध केला नाही वा नायडू यांचाही निषेध केला नाही. काँग्रेसचे नेते असे काही बोलले असले तर आम्ही त्यांचाही समाचार घेऊन, मात्र सभापतींनी सारासार विचार करूनच निर्णय घ्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

( संपादन - सुमित बागुल )

venkaiah naidu must apoligise says shivsena MLA prakash surve

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com