BJP leader Mohit Kamboj
Esakal
मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातही भाजपचे नेते मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध दाखल फसवणुकीचे मूळ प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा सीबीआयचा अहवाल यापूर्वीच सत्र स्वीकारला होता. त्यामुळे मूळ गुन्ह्याच्या आधारे दाखल केलेले हे प्रकरण आता सुनावणीयोग्य नसल्याचे निरीक्षण आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने नोंदवले. तसेच सक्तवसुली विभागानेही प्रकरण बंद करण्याची शिफारस करण्याबाबत दाखल केलेला अहवाल स्वीकारला. यामुळे कंबोज यांच्याविरुद्धचे हे प्रकरण कायमचे बंद झाले आहे. यामुळे कंबोज यांना दिलासा मिळाला आहे.