
मुंबई : ‘म्हाडा’तील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी
मुंबई : म्हाडातर्फे सरळ सेवा भरती परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम प्राधिकारणाने जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ६ व ७ जून २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.
म्हाडाच्या विविध १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले. उमेदवारांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत.
- राजकुमार सागर, सचिव, म्हाडा
Web Title: Verification Of Documents Of Candidates In Mhada Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..