सोसायटी पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेच्या अत्यंत महत्वाच्या सूचना, कोणत्या ते जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

कोरोनाचे रुग्ण उशिरा रुग्णालयात येत असल्याने उपचार करण्यावर मर्यादा येतात, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने प्रभाग कार्यालयांमार्फत गृहनिर्माण संस्थांना पत्र पाठवण्यात आले आहे.

मुंबई : गृहनिर्माण संस्थांंच्या पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावे. एखाद्या रहिवाशात फ्ल्यूसदृश लक्षणे आढळल्यास तत्काळ महापालिकेला कळवावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

मोठी बातमी : शाळा सुरु झाल्यानंतर काय? मुख्यमंत्र्यांनी दिल्यात 'या' महत्त्वाच्या सुचना...

कोरोनाचे रुग्ण उशिरा रुग्णालयात येत असल्याने उपचार करण्यावर मर्यादा येतात, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने प्रभाग कार्यालयांमार्फत गृहनिर्माण संस्थांना पत्र पाठवून रहिवाशांवर देखरेख ठेवण्याची सूचना केली आहे. विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमेकडील संस्थांना असे पत्र के पश्चिम प्रभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी पाठवले आहे. हाऊसिंग सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना 10 वर्षांखालील मुले, ज्येष्ठ नागरिक, श्वसनविकार, मधुमेह, रक्तदाब व इतर दीर्घकालीन आजार असलेल्या रहिवाशांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी : दहशतवादी कसाबला फासापर्यंत पोचवणाऱ्या हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

कोव्हिड रुग्ण आढळल्यानंतर इमारत अथवा मजला सील केल्यावर तेथील नियोजनाची जबाबदारीही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, रहिवाशांवर देखरेख ठेवणे ही कामे त्यांना यापूर्वीच देण्यात आली आहेतर. आता सील न केलेल्या इमारतींमधील रहिवाशांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही सोसायटी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

महत्वाची बातमी : कोरोना संदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी, महाराष्ट्राची लवकरच होणार कोरोनातून मुक्तता?

हेल्पलाईनवर कळवा
हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावे. एखाद्या रहिवाशात ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसत असल्यास महापालिकेला कळवावे, अशी सूचना पत्राद्वारे करण्यात आली आहे. के पश्चिम प्रभागाच्या 022-26239166 या हेल्पलाईनवरही ही माहिती देता येईल.

very important instructions of Mumbai Municipal Corporation to the Society officers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: very important instructions of Mumbai Municipal Corporation to the Society officers