
मुंबई : कोस्टल रोड (उत्तर) वेसावे ते भाईंदर प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पावा वेग द्यावा, प्रकल्प कामात येणारे संभाव्य अडथळे दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, प्रकल्प पूर्ततेसाठी विविध शासकीय प्राधिकरण, मंडळे यांच्याकडे पाठपुरावा करावा, महानगरपालिकेच्या विविध विभाग अंतर्गत समन्वय साधावा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. पॅकेज बी अंतर्गत गोरेगाव येथे १.२ किलोमीटर लांबीच्या 'नॉन सीआरझेड' क्षेत्रात फाऊंडेशनचे कामकाज सुरू असून या सर्व कामांची पाहणी बांगर यांनी केली. तसेच, सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्रात परवानगीशिवाय कामकाज करता येणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.