''त्या'' विनयभंग प्रकरणातील पीडित मुलगी देहरादूनला सापडली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

नवी मुंबई: पुण्यात मोटार ट्रान्सपोर्ट विभागातील निलंबित पोलीस उपमहानिरीक्षक निशीकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणारी पिडीत मुलगी अखेर देहरादुन येथे सुखरुप सापडली आहे. विशेष म्हणजे खारघर येथून बेपत्ता झालेल्या 19 वर्षीय तरुणासोबत पिडीत मुलगी सापडली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांसह सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकाल आहे. नवी मुंबई पोलिसांचे पथक मंगळवारी सायंकाळी पिडीत मुलीला घेऊन विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. 

कौटुंबिक कारणांमुळे शर्मिला ठाकरेंनी टाळली मुख्यंत्र्यांची भेट?

तळोजा भागात रहाणाऱ्या या घटनेतील पिडीत मुलीच्या 17 व्या वाढदिवशी पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे हे तीच्या घरी कुटुंबासह वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोरे यांनी पिडीत मुलीसोबत अश्‍लिल वर्तन केल्याचा आरोप पिडीत मुलीच्या पालकांनी केला होता. तसेच त्यांनी मोरे यांच्या अश्‍लिल वर्तन करतानाचे व्हिडीओ सुद्धा पोलिसांना दिले होते. त्यानंतर तळोजा पोलिसांनी पिडीत मुलीच्या आरोपांवरू न निशीकांत मोरे यांच्यावर विनयभंगासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आपल्या विरोधात गुन्हा दाखल होताच निशीकांत मोरे हे बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर 6 जानेवारी रोजी मध्यरात्री या घटनेतील पिडीत मुलगी सुद्धा आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाली होती. 

सावधान! प्रोटिन्स सप्लिमेंट करतेय बॉडीची बिघाडी

बेपत्ता होण्यापुर्वी पिडीत मुलीने डीआयजी निशीकांत मोरे यांच्यामुळे झालेल्या मानसिक त्रासातून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तळोजा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पिडीत मुलीचा शोध सुरु केला होता. त्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे पथके देखील तयार केली होती. मागील आठवडाभर पोलिसांचे पथक पिडीत मुलीच्या मागावर होते. अखेर ती देहरादुन येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने सोमवारी सकाळी पिडीत मुलीला खारघरमधील तीच्या 19 वर्षीय मित्रासोबत देहरादुन येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी विमानाने तीला घेऊन मुंबईत दाखल झाले आहे. पिडीत मुलीसोबत सापडलेला तीचा 19 वर्षीय मित्र देखील त्या दिवसापासून खारघरमधुन बेपत्ता होता. दरम्यान,याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती देण्यास नकार देण्यात येत आहे. बुधवारी याबाबत पत्रकार परिषद घेण्यात येणार असुन त्यात सविस्तर माहिती देण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The victim, who accused DIG Nishikant More of modesty, has finally been found safe in Dehradun.