धक्कादायक ! टिकटॉक स्टारचा प्रियकरासोबतचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

विक्रम गायकवाड
शनिवार, 11 जुलै 2020

तक्रारीवरून पोलिसांनी संबंधिताविरोधात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : टिकटॉकवर प्रसिद्ध असलेल्या एका तरुणीने प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवताना बनविलेला व चुकून तिच्याकडून स्नॅपचट अकाउंटवर पोस्ट झालेला व्हिडिओ काही लोकांनी इन्स्टाग्राम व युट्यूब या सोशल साईटवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे टिकटॉकवर लाखो चाहते असलेल्या या तरुणीचा प्रियकरासोबत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. खारघर पोलिसांनी टिकटॉक स्टार तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल केला असला तरी टिकटॉक स्टार तरुणीने प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरून सुरू आहे.  

हे ही वाचा : "...त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला धक्का बसेल अशी भूमिका घेतली", बाळासाहेबांबद्दल असं का म्हणालेत शरद पवार ?

या प्रकरणातील 22 वर्षीय टिकटॉक स्टार तरुणी खारघरमध्ये राहण्यास असून ती हिंदी, पंजाबी भाषेतील चित्रपटात ऍक्टिंग, सिंगिंग व मॉडेलिंगचे काम करते. तसेच ती टिकटॉकवर व्हिडिओ तयार करत असल्यामुळे ती देशभरात व परदेशात टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिचे टिकटॉकवर लाखो चाहतेदेखील आहेत. या तरुणीने गत महिन्यात 8 जूनला दुपारी आपल्या प्रियकरासोबत स्वेच्छेने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ बनविला होता. त्यावेळी व्हिडिओ चुकून तिच्याकडून तिच्या स्नॅपचट अकाउंटवर पोस्ट झाला होता. याबाबतची माहिती तिच्या मैत्रिणीने तिला कळविल्यानंतर व्हिडीओ 100 लोकांनी पाहून त्यातील 7 लोकांनी व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे तिला समजले. त्यानंतर या टिकटॉक स्टार तरुणीने अकाऊंटमधून 2 तासामध्ये व्हिडीओ डिलीट केला होता; मात्र त्यानंतर काही दिवसांमध्ये टिकटॉक स्टार तरुणीचा प्रियकरासोबतचा तो व्हिडिओ इन्स्टाग्राम व युट्यूब या सोशल साईट्सवर व्हॉयरल झाल्याचे तिच्या चाहत्यांकडून तिला समजले. त्यानंतर टिकटॉक स्टार तरुणीने याबाबत अधिक माहिती घेतली असता, तिचा व्हिडीओ वेगवेगळ्या लिंकवर व्हायरल झाल्याचे व त्यावर तिच्याबाबत अपमानास्पद व घाणेरड्या भाषेत कमेंट्स केल्याचे आढळून आले. तसेच शुभम श्रीवास्तव, आसिफ व शोयब खोसा यांनी या तरुणीचा प्रियकारसोबत असलेला सदर व्हिडिओ युट्यूब या सोशल साईटवर व्हायरल करून आर्थिक फायदा घेण्यास सुरुवात केल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. या कालावधीत तरुणीला काही व्यक्तींनी तिचा व्हिडिओ व्हाट्सअपवर व्हायरल करण्याची इन्स्टाग्रामवरून धमकी दिल्याचे या तरुणीने खारघर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  

नक्की वाचाकोरोना व्हायचा तेव्हा होईल, पण पिण्याच्या पाण्यातील आळ्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात..

या सर्व प्रकारानंतर टिकटॉक स्टार तरुणीने गत 8 जुलैला खारघर पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संबंधिताविरोधात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, टिकटॉकवर लाखो चहाते असलेल्या या तरुणीचा प्रियकरासोबत असलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर सध्या प्रचंड धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ही टिकटॉक स्टार तरुणी सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे या तरुणीने हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे.  

(संपादन : वैभव गाटे)

video of Tikok Star with her boyfriend has gone viral police report


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: video of Tikok Star with her boyfriend has gone viral police report