युतीचे बळ एका जागेने वाढणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी सभापती देशमुख यांचा विधान परिषद सदस्यपदाचा कालावधी २०२० पर्यंत होता. मात्र त्यांच्या निधनाने ही निवडणूक होत आहे.

मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी सभापती देशमुख यांचा विधान परिषद सदस्यपदाचा कालावधी २०२० पर्यंत होता. मात्र त्यांच्या निधनाने ही निवडणूक होत आहे.

विधानसभा सदस्यांच्या मतदानातून या जागेवरील सदस्याची निवड होत आहे. यामुळे शिवसेना- भाजपच्या सध्याच्या संख्याबळात एका जागेने भर पडण्याची शक्‍यता आहे. शिवसेना आणि भाजप युतीचे बळ हे विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीपेक्षा मोठ्या संख्येने जास्त आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोधदेखील होण्याची शक्‍यता आहे. 

सध्या विधानसभेत भाजप - १२३, शिवसेना - ६३, काँग्रेस - ४२ , राष्ट्रवादी काँग्रेस - ४० असे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांचे अलीकडे निधन झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्‍त झाली आहे. भाजप- शिवसेनेचे एकत्रित बळ १८६ होते, तर विरोधकांचे बळ ८२ इतके आहे. त्यामुळे युतीसाठी ही जागा जिंकणे अवघड नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Parishad Election Politics Yuti Seats