Vidhan Sabha 2019 : शिवसेनेला मोठा धक्का; 26 नगरसेवकांचे राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी बंडखोरीचा फटका बसत असताना मुंबई आणि ठाणे परिसरात सत्ताधारी शिवसेनेला याचा जास्त फटका बसल्याचे दिसत आहे. उल्हासनगर, कल्याणमधील सुमारे 26 नगरसेवक आणि 300 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.

ठाणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी बंडखोरीचा फटका बसत असताना मुंबई आणि ठाणे परिसरात सत्ताधारी शिवसेनेला याचा जास्त फटका बसल्याचे दिसत आहे. उल्हासनगर, कल्याणमधील सुमारे 26 नगरसेवक आणि 300 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेमधून नाराजीचा सूर समोर आला आहे. तिकीट वाटपावरून स्थानिक नेत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आज सकाळी 26 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. या नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने शिवसेनेसह भाजपाच्याही अडचणी वाढल्या आहेत. 

स्थानिक नेता धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ सर्वांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नेत्याला मिळावी अशी या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे बोडारे समर्थकांची नाराजी समोर आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha twenty six corporator resign