
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: एका माणसाने संपूर्ण पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात बसला आहे. त्याने पक्षाशी गद्दारी केल्याची जहरी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. शिवडी मतदारसंघातील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी त्यांनी आज सांगता सभा घेतली.