(VIDEO) ठाण्यात EVM मशीनवर शाई फेक..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

  • ठाण्यात EVM मशीनवर शाई फेक
  • EVMचा निषेध म्हणून फेकली शाई
  • ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांबे यांनी फेकली शाई
  • मतदानासाठी गेले असताना फेकली शाई

EVM  मशीन तसेच सरकारच्या विरोधात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांबे यांनी ठाण्यातील मुख्य पोस्ट ऑफिस येथे मतदानाला गेले असताना शाई ओतून सरकार चा निषेध केला. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी सुनील खांबे याना ताब्यात घेतलं आहे. 

ठाणे विधानसभा मतदारसंघात नावनोंदणी असलेले सुनील खांबे मतदान करण्यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालया शेजारील मतदान केंद्रात मतदानासाठी गेले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातून बाहेर पडण्याऐवजी आपल्याजवळील शाईच्या बाटलीमधील शाई थेट ईव्हीएम मशीनवर फेकली. एवढेच नव्हे तर त्यांनी यावेळी ईव्हीएम मशीनविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ईव्हीएम मशीनचा वापर तत्काळ बंद करा, अशा घोषणा त्यांच्याकडून दिल्या जात होत्या. त्यामुळे या मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला.

निवडणूक कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती बंदोबस्तावरील पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ खांबे यांना ताब्यात घेतले. मात्र हा सारा प्रकार सुमारे पंधरा ते वीस मिनिटे सुरू होता. खांबे यांना मतदान केंद्रातून बाहेर काढून थेट ठाणे नगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. पोलिसांनी खांबे यांना ताब्यात घेतले असले तरी सायंकाळपर्यंत त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मतदानाचे कामकाज संपल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यावर पुढील गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

 

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. अशातच आता पुणे, मुंबई, नाशिक या शहरांच्या तुलनेत ठाण्यात कमी टक्के मतदान झालंय. मोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये मतदारांमध्ये फारसा उत्साह नाही. असंच काहीसं चित्र ठाण्यात पाहायला मिळालं. ठाण्यात दुपारी 44.50 टक्के मतदानाची नोंद झालीये. 

WebTitle : vidhn sabha 2019 ink thrown on evm machine at thane center 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhn sabha 2019 ink thrown on evm machine at thane center