esakal | रियाचा द्वेष पाहून फार वाईट वाटतेय... विद्या बालनने घेतली रियाची बाजू
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या बालन

एक महिला म्हणून रिया चक्रवर्तीचा होणारा द्वेष पाहून फार वाईट वाटते. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष नाही का? की आता जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषी समजायचे?

रियाचा द्वेष पाहून फार वाईट वाटतेय... विद्या बालनने घेतली रियाची बाजू

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबईः सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयच्या हाती दिला गेला आहे. सीबीआयकडून रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली जात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला सोशल मीडियावर ट्रोलिंगला प्रचंड प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. याच मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने रियाची बाजू घेत ट्विट केले आहे.
 
काही दिवसांपूर्वी रियाने एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली. तेव्हापासून या प्रकरणात काही बॉलीवूड सेलिब्रिटीज रियाच्या बाजूने आपले मत मांडताना दिसत आहेत. अभिनेत्री विद्या बालन हिने एका पोस्टमध्ये लिहिले, "एका तरुण स्टारचा झालेला मृत्यू हा विषय एक मीडिया सर्कस बनला हे दुर्दैव आहे. एक महिला म्हणून रिया चक्रवर्तीचा होणारा द्वेष पाहून फार वाईट वाटते. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष नाही का? की आता जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषी समजायचे? कायद्याने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचा सन्मान करायला हवा आणि कायद्याला त्याचे काम करू द्यायला हवे, असे मत विद्याने मांडले आहे. 

चुकीला माफी नाही, नागरिकांवरही एफआयआर दाखल होणार

विद्या बालनच्या सोशल मीडियावरील या विधानानंतर बरीच खळबळ उडाली आहे. विद्या बालनने ट्विटर इंडियावर ट्रेंड करण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीने तिच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, जेव्हा सुशांतच्या न्यायासाठी जग लढा देत होता तेव्हा संपूर्ण बॉलीवूड शांत होते. आता अचानक प्रत्येक जण जागा झाला आहे आणि रियाला पाठिंबा देत आहे. याचा अर्थ असा आहे की, त्या सर्वांना असे वाटते की सुशांत निर्दोष नाही. तसेच बरेच जण विद्या बालनवर दोन्ही बाजूंनी बोलत असल्याचा आरोप करीत आहेत. विद्या बालनपूर्वी अभिनेत्री तापसी पन्नू रियाच्या समर्थनार्थ बोलली होती.

(संपादन- बापू सावंत)