
लॉकडाऊन हे 30 सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. बाजारपेठा, दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यासाठी पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी दुकानदार व नागरिक यांच्यासाठी कडक आदेश जाहीर केले आहेत.
उल्हासनगर : लॉकडाऊन हे 30 सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. बाजारपेठा, दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यासाठी पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी दुकानदार व नागरिक यांच्यासाठी कडक आदेश जाहीर केले आहेत.
दोनदा आदेशाचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंडाची वसूली व तिसरी चूक केल्यास दुकानदाराचे दुकान बंद तर मास्क टाळणाऱ्या नागरिकांवर एफआयआर असे आदेश डॉ. दयानिधी यांनी जारी केले आहेत. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी ही माहिती दिली.
उल्हासनगरात 9 हॉटस्पॉट होते.ते 2 वर आले आहेत. याठिकाणी पूर्वीसारखे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मॉल, बार, स्विमिंगपूल, सिनेमागृहे बंद ठेवली जाणार असून उर्वरित सर्व शहरातील बाजारपेठा, दुकाने, भाजीपाला हे सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुकानात सोशल डिस्टनिंग, सॅनिटायझर, हॅन्डवॉश बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, नागरिकांवर दक्षता समितीतील प्रमुख त्यांच्या टीमसोबत वॉच ठेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आर्थिक दंडासह एफआयआर
पालिका आयुक्तांच्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस 2 हजार रुपये, दुसऱ्या वेळेस 5 हजार रुपये दंड व तिसरी चूक केल्याचे दिसताच दुकान बंद केले जाणार आहे. तसेच नागरिक विनामास्क आढळतात पहिल्या वेळेस 500 रुपये, दुसऱ्या वेळेस 1 हजार रुपये दंड व तिसऱ्या चुकीला थेट स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर असे डॉ.राजा दयानिधी यांनी आदेशात म्हटले आहे.
-----------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)