
विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली.
मुंबई - विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. गेल्या अनेक महिण्यांपासून अकरावीच्या प्रवेशाचा तीढा सूटलेला नाही. तसेच खासगी कोंचिंग क्लासेसच्या शिक्षकांचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्यामुळे या समितीने राज ठाकरेंची भेट घेतल्याचे समजते.
पोलिस दल कोरोना मुक्तीच्या दिशेने?, लागण झालेल्या पोलिसांची संख्याही घटली
मराठा आरक्षणाला दोन महिण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तेव्हापासून राज्यातील लाखो अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. हा मुद्दा लवकरात लवकर कसा मार्गी लावता येईल या मागणीसाठी विद्यार्थी पालक समन्वय समितीने राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर धाव घेतली आहे. नेमके यातून मार्ग काय काढावा यासाठी सरकारला जागं करावं म्हणून राज ठाकरेंना समितीने साद घातली आहे. राज्यातील काही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अनेकांचे ते झालेले नाहीत. ही प्रक्रिया मराठा आरक्षश्रणामुळे अडकले आहेत. राज्यातील रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेसोबतच महाविद्यालयांना केलेल्या भरमसाठ फीवाढीमुळे पालक हैराण झाले आहेत.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ अपलोड करणारा भामटा अटकेत
यासोबतच राज्यातील खासगी कोंचिंग क्लासेसच्या मालक आणि शिक्षकांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक महिण्यांपासून खासगी कोचिंग बंद असल्याने शिक्षकांचे आतोनात हाल होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. राज्यातील खासगी कोचिंग क्लासेस लवकरात लवकर सुरू करावेत या मागणीसाठी त्यांचेही शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.