Jayant Patil : मतमोजणी प्रक्रियेत सावध राहा; जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना पत्र; फेरफार होण्याची भीती

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता आपण सगळ्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sakal

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता.४) होत आहे. या प्रक्रियेदरम्यान सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूलथापांना बळी न पडता, लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेत सतर्क राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता आपण सगळ्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. सर्वांनी जो संयम आणि दक्षता विविध टप्प्यावर बाळगली, तोच संयम आणि तीच सतर्कता मतमोजणी संपेपर्यंत आणि विजयाचे प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंत आपल्याला बाळगायची आहे.

या कालावधीत सत्ताधारी पक्षाकडून दिशाभूल करून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होईल, परंतु आपण पूर्णपणे दक्ष राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. पाटील पुढे म्हणाले, ‘‘देशात इंडिया आघाडीलाच बहुमत मिळणार असल्याचे अनेकांच्या लक्षात आले असतानाही सत्ताधारी दिशाभूल करत आहेत. कारण, तुम्हाला संभ्रमात टाकून मतमोजणीमध्ये फेरफार केला जाऊ शकतो’’, असेही त्यांनी म्हटले आहे.

आमच्यातील कोणीही भाजपत जाणार नाही

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीने लोकसभा निवडणुकीत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीलाही आम्ही एकत्रित सामोरे जाणार आहोत.

आमच्यातील कोणीही भाजपच्या संपर्कात नाही. कोण कोठे थांबणार आणि कोठे जाणार हे जनतेला माहिती आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. मंत्री अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपत जाणार असल्याचा दावा केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com