
डोंबिवली : डोंबिवली विधानसभेचे भाजप आमदार तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत आपली नाराजी जाहीर उघड करत भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी सपत्नीक पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता. त्यांची नाराजी दूर होत नसल्याने ते पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी अटकळ बांधली जात होती. जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मध्यस्थी करत म्हात्रे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घडवून देत म्हात्रे यांची नाराजी दूर केली.