

Vikas Mhatre And Ravindra Chavan discussing election strategies
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 22 मध्ये सध्या राजकारणाचा रंग अधिकच गडद झाला आहे. ज्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली, ज्यांच्यावर थेट टीका केली, त्यांच्याच सोबत आता निवडणुकीची रणनीती आखावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार विकास म्हात्रे हे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बसून पॅनलमधील निवडणूक रणनीतीवर चर्चा करत असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.