विरार : दिल्ली मध्ये 3 वर्षांपूर्वी मुलीचे झालेले हत्याकांड गाजले जाते. संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील मयत श्रध्दाचे वडील विकास वालकर यांचे आज सकाळी वसई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. .वसईतील श्रध्दा वालकर (२८) ही तरुणी प्रियकर आफताब पूनावाला सोबत दिल्लीत रहात होती. मे २०२२ मध्ये आफताबने तिची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुकडे गुडगाव येथील जंगलात फेकून दिले होते. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. वसईत राहणारे मयत श्रद्धाचे वडील विकास वालकर मागील ३ वर्षापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. .आज सकाळी वालकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते वसईच्या संस्कृती अपार्टमेंटमध्ये रहात होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच एकच खळबळ उडाली. त्याच्यावर संध्याकाळी वसईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले..तीन वर्षा पासून वडील विकास हे श्रध्दाच्या अस्ति दर्शनासाठी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत होते.प्रियकर आफताबने जंगलात फेकलेल्या श्रध्दाच्या मृतदेहांच्या तुकड्यांपैकी १३ अवशेष दिल्ली पोलिसांना मिळाले होते. श्रध्दावर अंत्यसंस्कार करायचे असल्याने तिचे वडील विकास वालकर मृतदेहाच्या अवशेषांची मागणी करत सतत दिल्लीवारी करत होते. अशा हत्याकांडा विरोधात देशभरातून संताप व्यक्त होतो. पण हे प्रकरण जलतगती न्यायालयात असूनही अनेक तांत्रिक गोष्टीमुळे निकाल लवकर लागत नाही. .या विलंबामुळे श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष देखील मिळू शकले नाही अशी खंत त्यांना होती. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ज्या प्रकारे चौकांना फाशीची शिक्षा मिळवून दिली त्याप्रमाणे श्रद्धा वालकर प्रकरणात न्याय मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न होते. मात्र त्यांना शेवटपर्यंत मृतदेहाचे अवशेष मिळालेेले नव्हते. मुलीच्या मृतदेहाचे अवशेष दिले नाहीत तर मी दिल्लीत आमरण उपोषण करण्याचा असा इशाराही विकास वालकर यांनी दिला होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.