
घाटकोपर : मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाबाबत सामाजिक न्याय विभाग धोरणात्मक निर्णय घेत नसल्याने विक्रोळी कन्नमवार नगरमधील हजारो रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. इमारती जीर्ण झाल्या असून पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.