esakal | विलेपार्ले हत्याप्रकरण : जावयाकडून सासूवर अनैसर्गिक अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

विलेपार्ले हत्याप्रकरण : जावयाकडून सासूवर अनैसर्गिक अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहा दिवसांपूर्वी विलेपार्ले येथे झालेल्या एका वयोवृद्ध हत्येच्या गुन्ह्यांत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मृत महिलेच्या म्हणजेच सासूवर जावयानेच अनैसगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत आता पोलिसांनी ३७७ कलमाची वाढ केली आहे. याच गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीच्या जावयाच्या पोलीस कोठडीत १४ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

साकिनाका येथील घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असताना आता विलेपार्ले येथील वयोवृद्ध महिलेच्या हत्येच्या गुन्ह्यांत ही माहिती उघडकीस आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. २ सप्टेंबर विलेपार्ले येथे एका ६१ वर्षांच्या महिलेची हत्या झाली होती. ही हत्या तिच्याच रेकॉर्डवरील जावयाने केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी जावयाला नंतर विलेपार्ले पोलिसांनी अटक केली होती. या महिलेचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त होताच त्यात तिच्या गुप्त भागावर दुखापत असल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा: एसआरए पात्रतेसाठी सचिवांच्या सहीचा गैरवापर; प्रकरणांची होणार चौकशी

तपासात आरोपीनेच त्याच्या सासूच्या गुप्त भागावर बांबूद्वारे अनैसगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. मृत महिलेची मुलगी आरोपीची पत्नी असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध २८ हून अधिक गुन्ह्यांची नोंद होती. यातील आठ गुन्ह्यांत त्याला शिक्षा झाली होती. हत्येच्या दोन दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. यावेळी त्याला त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केल्याचे समजले. ती तिच्या दुसर्‍या पतीसोबत घरातून निघून गेली होती. तिचा पत्ता तिच्या आईला म्हणजेच सासूला माहित होता. मात्र वारंवार विचारणा करुनही तिने तिचा पत्ता सांगितला नाही. त्यातून त्यांच्यात वाद झाला आणि नंतर त्याने तिची हत्या केली होती. याच गुन्ह्यांत चौकशीदरम्यान आता नवीन खुलासा झाला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत आता पोलिसांनी ३७७ कलमाची वाढ केली आहे. सध्या आरोपी जावई पोलीस कोठडीत आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपत होती. त्यामुळे त्याला पुन्हा लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ केली आहे.

सासूच्या हत्या करुन या जावयाने जवळच असलेल्या सत्कार बार ऍण्ड रेस्ट्रॉरंटमध्ये मॅनेजरकडे पैशांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर मालकाने त्याला तीन हजार आणि दोन दारुच्या बाटल्या दिल्या होत्या. तो तेथून निघून गेल्यानंतर त्याने त्याच्याच सासूची हत्या केल्याचे त्यांना समजले होते. त्यानंतर त्याने ही माहिती विलेपार्ले पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर त्याच्याविरुद्ध हत्येनंतर खंडणीचा दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top