
नितीन बिनेकर
मुंबई : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी तातडीने सुरू करा, अन्यथा दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्या दादर स्थानकां पुढे जाऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेला दिला आहे. गुरुवारी राऊत यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांची भेट घेतली. या भेटीत गाडी सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली.